Guest Blog of the Month

by Mrs. Rekha Palvankar

 Posted on Thu Jul, 14 2016 10:21

From this June month we start to feature a new Travel Guest Blog and our blog of the month of June was written by Mrs. Rekha Palvankar who had love her All of Europe tour thoroughly. And she expresses her.

अनोखी युरोपची टूर आजच संपली, आशिश ने त्यासाठी खूप मेहनत घेतली,
निसर्गाने सुद्धा आम्हाला साथ दिली,यूरोप टूर आमची यशस्वी झाली,
देवाच्या भजनाने व्हायची सुरुवात,नंतर हळकुंडे,कवळे,मृण्मयी यांच्या गाण्याची बरसात,
सर्वांनी या टूर मधे घेऊन सक्रिय सहभाग,निसर्ग आणि इतिहासाचे अनेक उलगडले विभाग,
आम्हा सर्वांची जमली चांगलीच गट्टी,या टूर मध्ये नाही झाले कोणीही कष्टी,
गाणारे होते सर्व एकापेक्षा एक,या सर्वांनी गायली गाणी अनेक,
सौमिताच्या गाण्याचा एक न्यारा ढंग,सौमक मूळे त्याला चढला एक वेगळाच रंग,
खूप किस्से सांगून आशिषने रंगवली फूड अंताक्षरी, Tour Manager म्हणून हाच Perfect ही गोष्ट ठरली खरी,
कॅप्टन ने गाडी चालवली छान न वाजवता होर्न, वेळाकाळाचे आम्हा न राहिले भान,
पारगावकर सतत आठ्वल्यांची नक्कल करायचे, आणि आम्हा सर्वाना हसवत रहायचे,
त्यांनी सर्वाना टूर मध्ये सहभागी व्हायला लावले,फक्त निलिमा, प्रिया, सुलभा त्यांच्या नजरेतून सूटले
कोठारी साहेबांना जरी आम्ही दिला निवृत्तीचा निरोप, त्यांच्या मिसेसने गाणी म्हणून गाजवला युरोप,
कजबजे साहेबांना असायचे लगेज चे टेंशन, सौरभ मात्र त्यांचा जातीने देत होता तिकडे अटेंशन,
दिनेश, विजया, राऊत फॅमीली एन्जॉय करीत होते मस्त, तरी सरुवातीपासून शेवटपर्यन्त त्यांनी पाळली शिस्त,
वेद, पार्थ, सौरभ होते जरी फोटोमध्ये बिझी,तरी एकट्या रेखा मॅडम ची त्यांनी घेतली खूप काळजी,
देशपांडे आणि कवळे दाम्पत्य फॉरेनचेच वाटले, आमच्या ग्रुप मध्ये वाटत ते चूकूनच आले,
स्वरालीची इंग्लिश गाणी सर्वांनाच भावली, सर्वांची आवडती होती ही छोटीशी बाहुली,
मृण्मयीने म्हटले CRY CRY आणि झिंगाट, श्रेयाच्या वाढदिवसाचा केवढा होता थाट,
आशिशने सुचवली टोपण नावे सुंदर, टॉयलेटला जंतर मंतर तर निग्रो शामसुंदर,
बस मधून जेव्हा पाहिले घराघरातून, एकच तेवढी खंत की कोणीही पाहिले नाही वाकून,
दिनेश विजया करीत होते Ready Eat ची मेजवानी, आम्ही सर्व चिवडा , खाखरा खाऊन पीत होतो पाणी,
दुपारचे जेवण एवढे नव्हते खास, जव्हेरी साहेब आम्हा बडीशेप दयायचे हमखास,
पाटलांचे इंग्लिश ऐकून वाटले यांचा काय नेम, इथेच चुकून रहायला लागलं तर म्हणतील NO PROBLEM,
खरेदीसाठी सर्वांची होत होती झुंबड, एकमेकांच्या वस्तु बघण्याची सर्वाना आवड,
फोटो आणि सेल्फि तर आम्ही खूप काढले, GO DISHA चे कस्टमर किती तरी वाढवले,
अशा रीतीने ट्रिप आमची लवकर वाटतं संपली, आशिशला मिस करणार याची हुरहुर वाटली.
                                                                                                        सौ. रेखा पळवणकर

By Mrs. Rekha Palavankar & Family (went to All OF EUROPE on 22 Jun 2016 from Mumbai, Maharashtra)