Mr. Vijay Ganesh Kude
सुहासजी...युरोप अजूनही डोक्यातून जात नाही...सर्वच ठिकाणे डोळ्यासमोर येतात...मनात खोलवर डोकावतात...सद्गुरू' अनिरुद्ध बापूंच्या कृपेने ट्रिप वेल प्लान्ड होऊन निर्विघ्नपणे पार पडून आनंदानं सुखात मधुर आठवणी देणारी ठरली.....Air Indiaच्या लंडन flight मधून ४0000 फूटावरून दिसलेला अलौकिक रंगाच्या पसार्यातला अतीशय दिव्य सूर्योदय ....तुमच्या अभिजात अभिरुचीसंपन्न अभ्यास पूर्ण काॕमेंट्रीने खरोखरच बहार आणली...रिअली अवर्णनीय...लंडनची घरे...रस्ते ...क्रुझची जादूई सफर...निदरलँड मधली सुबक निसर्गात रमणारी घर...असंख्य रंगाच्या उधळणीतून बहरलेले डवरलेले ट्युलीप गार्डन...ब्रुसेल्सचा सुसु करणारा बालक...पॕरीसचा नयनरम्य आयफेल ....तेथीलच क्रुझ...क्लायमॕक्स म्हणजे पौर्णिमेला पॕरीसची रात्री ची अत्यंत अविस्मरणीय सफर...An evening in Paris, रात के हमसफर...अशा समयोचीत भावमधुर सुरेल गाण्यांची मेलोडीयस आतिषबाजी....
त्या वर पूर्ण चंद्राच्या साक्षीने झळाळणारा आयफेल टाॕवर...no words to express,...जर्मनी चे अंतर्मुख करून अंतर्यामी भिनलेले black forest,.,त्यावरून खमंग रोस्टी...रसाळ चेरी...Rhine fall धोधो कोसळणारा...स्विटझर्लंड ची मनोहर स्वप्नभूमी...अकेले अकेले कहा जा रहे हो...ची आठवण देऊन गेली ....आॕस्ट्रीया...युरोपातील खरेखुरे नंदनवन...परमेश्वराने फुरसतीत याची निर्मिती केलेली असावी ...beautiful ....सुबक Lichtenstein, नंतर वास्तू शिल्प कलेचे आगर फ्लाॕरेंन्स...व्हेनिसची कल्पकता...गंडोलाची सैर...व्वा...तेथला भावूक सूर्यास्त ...रोम चा रोमहर्षक इतिहास ....युरोप एक dreamland..,येथली सुंदर हाॕटेल्स...मायभूमीपासून हजारो मैल दूर राहूनही प्रेमाने खाऊ घालणारे आपल्या मातीशी ईमान राखणारे सच्चे भारतीय... ...येथली स्वच्छ हवा...निर्मळ हिरवाई...,मन मोहरून येते ...अचानक भावविभोर होते...इथे येण्याचे स्वप्न ...बापूकृपेने पूर्ण झाले...thanks to especially you Suhasji made our trip really enjoyable ...thanks to Go disha...with ample of sweetest memories ,...मी अंबज्ञ आहे...